मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महिलांचे स्नान करताचे व्हिडीओ बनवून एका डार्क वेबवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून ते डार्क वेबवर विकल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे. अटके केलेल्या तीन जणांमध्ये दोन आरोपी महाराष्ट्रातील आहे. सांगलीमधील प्राज पाटील आणि लातूरमधील प्रज्वल तेली याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळामधून प्राज पाटीलला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. तर लातूर जिल्ह्यातील प्रणव तेली याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रणव तेली नावाचा आरोपी या प्रकरणात परदेशी हॅकर्सच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. तर तिसरा आरोपी प्रयागराज येथील असून चंद्रप्रकाश फुलचंद असे नाव आहे.
सदर प्रकरणात एकूण 13 एफआयआर दाखल-
प्रणव तेलीसोबत सांगलीमधील प्राज पाटीलने प्रयागराजमधील कुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे अर्धनग्न व्हिडिओ बनवले आणि डार्क वेबवर पोस्ट केले. सर्वजण टेलिग्रामवर वेगवेगळे अकाउंट तयार करून आणि काही टेलिग्राम अकाउंटचे सदस्यत्व 2 हजार ते 4 हजार रुपयांमध्ये मिळवून या व्हिडीओसाठी पैसे कमवत होते.याशिवाय त्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील हॉस्पिटल,मॉलमधील महिलांचे व्हिडिओ बनवून पोस्ट केले. सदर प्रकरणी लातूरमधून पैशांच्या व्यवहाराची लिंक सापडली आहे. लातूरमधील आरोपी प्रज्वल तेली त्यात परदेशातून पैसे आल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली आहे. गुजरात आणि प्रयागराजमध्ये 2 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण 13 एफआयआर दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान, गुजरातमधील राजकोटच्या महिला रुग्णालयातील प्रकार काही दिवसापूर्वी उघड झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.
स्त्री रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक-
गुजरात येथील स्त्री रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करुन महिलांचे व्हिडीओ एकत्र करण्यात आले होते. त्यानंतर हे व्हिडिओ वेगवेगळ्या डार्क साईटवर तसेच युट्यूब चॅनलवर अपलोड केले जात होते. काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. अहमदाबादच्या सायबर सेलकडून तपास सुरू असताना त्यांना लिंक मिळाली.. व्हाट्सॲप आणि टेलिग्राम या सोशल माध्यमाच्या द्वारे व्हिडिओची विक्री केली जात असल्याचे समोर आले. त्याचे कनेक्शन लातूर येथे असणाऱ्या एका तरुणापर्यंत आले.
