मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थीची संख्या आणखी वाढणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर चालू महिन्यातय आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली, साधारण 2 कोटी 11 लाख 860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र चालू फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या सामनी प्रक्रियेत अपात्रांच्या संख्येत भर पडली आहे. या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास 2 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळं या फेब्रुवारीचा हफ्ता या महिलांच्या खात्यात येणार नसल्याचे समोर येत आहे.
