भरत गोगावलेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
कोकणात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. तर कोकणातील ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कोकणातील आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे दोन शिलेदार ठाकरेंकडे राहिलेले आहेत. उद्धव ठाकरेंकडून कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न केले जात आहेत. वैभव नाईक यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांच्याबाबत मोठा दावा केलाय.
राजन साळवी यांच्या मागे एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर ते एक दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आणि अखेर शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. तर दुसरीकडे वैभव नाईक यांच्या मागेदेखील एसीबी चौकशी ससेमिरा लागला आहे. वैभव नाईक यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेण्याआधी त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता यावरून भरत गोगावले यांनी मोठं भाष्य केले आहे.