हुपरी/महान कार्य वृत्तसेवा
सालाबाद प्रमाणे हुपरी परिसरामध्ये श्री अंबाबाई यात्रा हि भरविण्यात येते या यात्रेनिमित्त हुतात्मा स्मारक या ठिकाणी पाळणे वाल्यांचा व्यवसाय चालतो तसेच भेलगाडे, पाणीपुरी, आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ हे या स्मारकमध्ये विकले जातात काही ठेकेदारांच्या मुद्द्यावरून या ठिकाणी वाद निर्माण झालेला असून यात्रा कमिटी, नगरपरिषद, व ठेकेदार यांच्यामध्ये मतभेदाचा वाद निर्माण झालेला असून त्यातून अजून कोणताही निर्णय झालेला नाही पाळण्याच्या ठेक्यावरून झालेल्या वादावरती पडदा पडावा या उद्देशाने हुपरी गावचे सर्कल व तलाठी यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारकाच्या गेटला कुलूप घालून हे गेट सील करण्यात आले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे गेट खुले केले जाणार नाही हुपरी गावातील यात्रेत उठलेल्या वादामध्ये सर्व सामान्य नागरिकांच्या आनंदा वरती पाणी पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर चाललेल्या वादावरती निर्णय घ्यावा व हुपरी गावातील यात्रा शांततेत पार पडावी या उद्देशाने पावले उचलावीत असे नागरिकांतून बोलले जात आहे.