बीड/महान कार्य वृत्तसेवा
फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केली आहे. दरम्यान, उद्या मस्साजोगचे ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच कृष्णा आंधळे यांची संपत्ती जप्त करणे एक प्रक्रियेचा भाग आहे, असेही ते म्हणाले. संतोष देशमुखांच्या हत्येला 60 दिवसापेक्षा अधिक कालावधी झाला असून अद्याप एक आरोपी फरार आहे.
उद्या मस्साजोगचे ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच कृष्णा आंधळे यांची संपत्ती जप्त करणे एक प्रक्रियेचा भाग आहे. मात्र कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी असेही ते म्हणाले आहेत. ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल. तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत, असेही देशमुख म्हणाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी खून झाला होता तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता. तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती यामध्ये कृष्ण आंधळे यांच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
आंधळेची चहूबाजूंनी कोंडी, कोर्टाकडून संपत्ती जप्त करण्याचे आदेश; मस्साजोगकरांनी बोलावली तातडीची बैठक
