Spread the love

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेहबूब शेख यांचा टोला

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंवर टीका करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत .दरम्यान, धस मुंडे यांची भेट यात काही नवल नाही.. त्यांचा दोस्ताना जुना आहे… याप्रुवी अनेकदा याचा प्रत्यय आला आहे. धस मुंडे ही जय – विरू ची जोडी आहे.या दोघांची भेट व्हॅलेंटाईनला झाली का कधी झाली हे माहिती नाही.दोन समाजात तेढ निर्माण करायचे आणि पुन्हा भेट घ्यायची असे हे धोरण आहे. असं म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीवर टोला लगावला.
देशमुख यांच्या खून प्रकरणात धस, पवार आणि नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री यांना विनंती केली पाहिजे होती की मुंडे यांचा राजीनामा घ्या म्हणून.या सर्व प्रकारात अभिमन्यू पवार, सुरेश धस, नरेंद्र पाटील हे कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलत आहेत. त्यांचा आका कोण आहे? असा सवालही त्यांनी केला. बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सोनवणेंसह शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती.त्यात ते बोलत होते.
महाराष्ट्रात जर वर्चस्व मिळाले ते ईव्हीएम कृपा आहे.मोदी यांच्यापेक्षा फडणवीस, शिंदे आणि अजित पवार लोकप्रिय आहेत का? असा सवाल त्यांनी केला.लोकसभेला ज्याना टाळले त्यांना विधान सभेला पुन्हा कसा काय जनाधार मिळू शकतो..? 82 दिवसांनी परळीत गुन्हा दाखल झाला.. या सर्व प्रकाराला गृहमंत्री जबाबदार आहेत..परळी मतदार संघातील 122 बूथ चे सीसीटीव्ही फूटेज मागितले आहेत.
धस मुंडे यांची भेट यात काही नवल नाही.. त्यांचा दोस्तांन जुना आहे… याप्रुवी अनेकदा याचा प्रत्यय आला आहे..धस मुंडे ही जय – विरू ची जोडी आहे..या दोघांची भेट व्हॅलेंटाईनला झाली का कधी झाली हे माहिती नाही.दोन समाजात तेढ निर्माण करायचे आणि पुन्हा भेट घ्यायची असे हे धोरण आहे.देशमुख यांच्या खून प्रकरणात धस, पवार आणि नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री यांना विनंती केली पाहिजे होती की मुंडे यांचा राजीनामा घ्या म्हणून..या सर्व प्रकारात अभिमन्यू पवार, सुरेश धस, नरेंद्र पाटील हे कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलत आहेत.. त्यांचा आका कोण आहे? असा सवाल त्यांनी केला.