नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचले, जिथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांची भेट घेतली. मस्क यांची मुलेही व्हाईट हाऊसमध्ये पोहोचली. यावेळी एलॉन मस्क व्हाईट हाऊसमध्ये आपले विचार मांडत होते, तर त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्पसोबत मजा करताना दिसला. मस्क यांच्या चिमुकल्या मुलाने ट्रम्प यांनी असे काही म्हटले की त्यामुळे त्यांचा चेहराच पडला. यानंतर आता काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनीही फिरकी घेत टिप्पणी केली आहे.
मस्क यांचा मुलगा ट्रम्प यांच्या टेबलाभोवती खेळताना दिसला. यावेळी त्यांनी ट्रम्प यांना इंग्रजीत सांगितले की, ‘तुम्ही राष्ट्राध्यक्ष नाही आहात, तुम्हाला येथून निघून जावे लागेल.’ अवघ्या 12 सेकंदाचा हा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट केला आहे. श्रीनेत यांनी लिहिले की, ”तुम्ही राष्ट्रपती नाही आहात, तुम्हाला येथून निघून जावे लागेल.” खेळखेळता मस्क यांच्या मुलाने ट्रम्प यांना हे सांगितले. तथापि, मुले अनेकदा आजूबाजूला किंवा घरात जे ऐकतात तेच सांगतात. त्यानं असे कुठे ऐकले असेल?
पंतप्रधान मोदींनी एलॉन मस्क यांची भेट घेतली
दरम्यान, अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसमध्ये टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांची भेट घेतली. दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी रात्री वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ब्लेअर हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
मस्क यांची तीन मुले दिसली
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्ज यांच्याशी चर्चा संपल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यात ही भेट झाली. पंतप्रधानांसोबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही तिथे होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अतिथीगृह असलेल्या ब्लेअर हाऊसमध्ये टेक दिग्गज मस्क त्यांची तीन मुले, एक्स, स्ट्रायडर आणि अझूर यांच्यासमवेत होते. पीएम मोदी आणि मस्क यांची अनेकदा भेट झाली आहे. 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी सॅन जोस येथील टेस्ला प्लांटलाही भेट दिली होती. ते सरकारच्या कार्यक्षमतेच्या नव्याने स्थापन झालेल्या विभागाचे प्रमुख आहेत. ते अध्यक्ष ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि विश्वासू सल्लागार म्हणून उदयास आले आहेत.
