जयसिंगपूर/महान कार्य वृत्तसेवा :
रविवारी (ता. 9) रात्री दहाच्या सुमारास शहरातील कोल्हापूर-सांगली महामार्गावर असणाऱ्या ब्लड बँकेशेजारी दोन चार चाकी व एक दुचाकी गाडी यांच्यात जोराची धडक झाली. या तिहेरी अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह एक जण ठार झाला. श्रीशा सुरज शिंदे (वय अडीच वर्ष, रा.सहावी गल्ली जयसिंगपूर, सध्या रा. सांगली) व बंदेश दशरथ उळागड्डे (वय 51, रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. याबरोबरच जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सुरज महादेव शिंदे (वय 32), शिवानी सुरज शिंदे (वय 23), सौरभ संजय शिंदे (वय 24, रा.सांगली) अशी नावे आहेत.
शिंदे कुटुंबीय चार चाकीने सांगलीकडे जात असताना हा अपघात झाला. मृत श्रीशा आईबरोबर पुढील सीटवर बसली होती. अपघातानंतर जखमी होऊन तिचे निधन झाले तर दुसऱ्या चार चाकीमधून जाणाऱ्या उळागड्डे यांचाही अपघातात मृत््यू झाला. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन करून मृतदेह नात्ोवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान मृत््युामुखी पडलेल्या श्रीशाच्या नात्ोवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला. मृत उळागड्डे यांची जयसिंगपूर सासरवाडी आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मार्गावर वाहत्ुाकीची कोंडी निर्माण झाली. सांगलीच्या दिशेने उदगावपर्यंत आणि जयसिंगपूर बस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी दाखल करत वाहत्ूाक पूर्ववत केली. रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होत्ो.
