Spread the love


शिरोळ/प्रतिनिधी:
शिरोळ शहरातील मुख्य रस्त््यावर साईडला असलेल्या चालु असलेल्या हॉस्पिटलच्या नव्या उद्घाटन काही दिवसांत होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हॉस्पिटल मुख्य रस्त््यावर असल्याने येथे आधीच मोठ्या प्रमाणात वाहत्ूाक होत असत्ो. शिवाय पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्यावरच लागलेली असतात. मुख्यरस्त्याच्या मध्यापासुन ते हॉस्पिटलपर्यंत सोडलेल अतंरदेखील वापरात असाल्यामुळे वाहतुक कोफ्लडी निर्माण होत असते. काही वाहने मुख्य वळणावर असल्याने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी अडथळा होत असतो. उद्घाटन सोहळ्यादरम्यान वाहत्ूाक कोंडी होऊ नये आणि वाहनधारकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था करण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे. या दरम्यान पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच वाहतुक पोलीस त्ौनात करण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.