Spread the love

मुंबई महापालिकेचा 74,427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मुंबई महापालिकेचा सन 2025-26 अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तब्बल 74 427. 41 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. 60.65 कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ आणि शुल्क वाढ लादलेली नाही. हाती घेण्यात आलेल्या विकास प्रकल्प कामांना गती देतानाच आर्थिक संकटातही जनतेवर कोणताही बोजा न लादता महसूल वाढीवर अधिक भर देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचा सन 2025-26च्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी यांनी महापालिक आयुक्त डॉ भूषण गगराणी यांना सादर केला त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सन 2025 26चा महापालिका अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांना सादर केला. यावेळी महापालिका अतिरिक्त डॉ विपीन शर्मा, महापलिका सचिव रसिका देसाई , उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, उपप्रमुख लेखापाल गोसावी उपप्रमुख लेखापाल (अर्थसंकल्प)अरुण जाधव आदी उपस्थित होते.
चालू अर्थसंकल्प हा 59 हजार 900 कोटींचा मांडण्यात आला होता तो सुधारीत करून त्याचे आकारमान 65, 180 कोटींवर नेण्यात आले आणि आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान या सुधारीत अर्थसंकल्पाच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढवून 74,427.41 कोटी रुपयांवर नेवून ठेवले आहे. यामध्ये भांडवली खर्चाकरता 43 162 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर महसुली करता 31,204 कोटी रुपये खर्च होणार आहे. चालू आर्थिक वर्षांत 12, 119 कोटी रुपये इतका निधी तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणद्वारे वळता केला होता, परंतु आगामी अर्थसंकल्पात ही रक्कम 16,699 कोटी रुपये एवढी दर्शवली आहे. त्यामुळे अंतर्गत कर्जावरच अर्थसंकल्पाचा आकडा वाढवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

अतिरिक्त चटई क्षेत्र अधिमुल्याच्या रकमेपोटी 300 कोटी रुपये, रिक्त भूभाग भाडेपट्टा पोटी 2000 कोटी रुपये, झोपडपट्टी भागातील व्यावसायिक वापर करता मालमत्ता करापोटी 350 कोटी रुपये अशाप्रकारे महसूल वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
स्वच्छ, शाश्वत आणि सक्षम मुंबईसाठी कटिबध्द या मंत्राचा नारा देत महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त आणि शाश्वतता, अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अनुषंगाने वित्तीय शिस्त, पायाभूत सेवा सुविधांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण आरोग्य व शिक्षण व्यवस्था, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण, सामाजिक उपक्रम, प्रशासकीय व कार्यालयीन कार्यक्षमता आदींवर भर देत अर्थसंकल्पाचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला.