बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवा
बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू झाली होती त्यामध्ये तब्बल 200 च्या वर ग्रामस्थांना टक्कर पडलं होतं. त्यात लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत आणि महिलांमध्ये ही केस गळती पहावयास मिळाली होती. केस गळती का होतेय? याच कारण शोधण्यासाठी दिल्ली, पाटणा, चेन्नई, मुंबई येथून डॉक्टर पथक दाखल झाल होते. विविध प्रकारच्या तपासण्या यावेळी टक्कर पडलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. अशातच आता पिडीत ग्रामस्थांना पुन्हा केसे येऊ लागली आहेत.
केसं परत कशी आली?
ग्रामस्थ टक्कर व्हायरसने चिंताग्रस्त असताना आयुष्य होमिओपॅथी आणि युनानीच पथक टक्कर पडलेल्या रुग्णाच्या गावात तळ ठोकून होते. आयुष्य होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकाने दिलेल्या औषधाने केस गळतीमुळे गेलेली केस आता परत येऊ लागल्याचे सांगत केस गळतीच्या रुग्णांमध्ये आता घट झाली असल्याची माहिती आरोग्य केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.
तिसऱ्या दिवशी थेट टक्कल
बुलढाण्यातली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली होती. सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणं, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीवरून डॉक्टरांचे पथक येऊनही यामागचे नेमके कारण समजू शकले नव्हते.
पोरांची लग्न जमेना
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केसगळतीच्या आजाराने अनेकांना त्रस्त केले आहे. या आजाराचे रुग्ण सापडलेल्या बोंडगावात आता कोणीही लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही. ऐन लग्नसराईच्या दिवसांत लग्नाला आलेल्या मुलांना कोणीही मुली देत नसल्याने, तसेच मुलींनाही लग्नासाठी मागणी येत नसल्याने पालकांची चिंता वाढली होती.