मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
लाडक्या बहिणींच्या मतांच्या जोरावर महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यानंतर आता सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे.या छाननीत अनेक अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिलांना आता योजनेचे 1500 रूपये मिळणे बंद होणार असल्याची माहिती आहे. जर हे अर्ज बाद ठरले तर महिलांना योजनेचे 9000 रूपये परत करावे लागणार आहे. विशेष म्हणजे सरकार हे पैसे तुमच्याकडून घेणार नसल्याची माहिती आहे. याउलट महिलांनी स्वइच्छेने द्यावे, असे बोलले जात आहे.
लाडकी बहीण योजनेची सूरूवात जुलैपासून झाली आहे. तेव्हापासून आता डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात 9000 रूपये जमा झाले आहेत. आणि आता जानेवारी महिन्यात 1500 चा सातवा हप्ता दोन ते तीन दिवसात येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही आनंदाची बाब आहे. पण ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांना झटका बसणार आहे.
ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहत आहेत. गेल्या पाच महिन्यात ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यांची यादीही या अर्ज पडताळणीत समोर येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार आहोत. त्याचसोबत चुकीची माहिती घेऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींनी स्वत:हून पुढे येऊन अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
या महिलांना फक्त 500 रूपये मिळणार
खरं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर दुसऱ्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पण ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिला आहेत, त्यांना फक्त 500 रूपये मिळणार आहेत. कारण या महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेतून 1000 रूपये आधीच मिळतात. त्यामुळेच त्या महिलांना केवळ 500 रुपयेच मिळणार आहेत.