मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्य सरकारकडून शनिवारी (दि.19) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, एकाच दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाल स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसलाय. आदिती तटकरे यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सूपुर्द करण्यात आली होती. त्यामुळे गिरीश महाजनांना देखील मोठा धक्का बसलाय.