Spread the love

 सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहनधारकांचा संताप्त सवाल 

प्रविण पवार/महान कार्य वृत्तसेवा

पंचगंगा साखर कारखान्यासमोर असणाऱ्या खोक्यांच्या अतिक्रमण हटवण्यासाठी शनिवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणाच्या ठिकाणी भेट देत पुन्हा आठ दिवसाची मुदत दिली आहे. यापुर्वीही अनेकदा नोटिसा  दिल्या असतानाही पुन्हा मुदत देण्याचा घाट कशासाठी ? सध्या गळीत हंगाम सुरू असल्याने  वारंवार वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे अतिक्रमण हटवणे आवश्यक असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मुदत देत आहे त्यामुळे  या ठिकाणी वाहनधारकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल विचारला जात आहे. 

 दैनिक महानकार्याने 5 जानेवारी व 6 जानेवारी रोजी गंगा साखर कारखान्यासमोरील खोक्याचे अतिक्रमण हटवावे याबाबत फक्त प्रसिद्ध केले होते.कबनूर चौकाप्रमाणेच पंचगंगा सहकारी साखर कारखान्यासमोर खोकी धारकांनी रस्ता अडवला आहे. गेल्या वर्षभरापासून हातकणंगले इचलकरंजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी गटार करण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम पंचगंगा कारखान्याच्या भिंती लगतचे  गेस्ट हाऊस च्या गेट पर्यंत पूर्ण झाले आहे. तर पश्चिमेकडील बाजूचे गटारीचे  काम पूर्ण झाले आहे. परंतु गेस्ट हाऊस च्या गेट पासून गाडी अड्ड्याच्या गेट पर्यंत खोकी धारकांनी अडवणूक केल्याने गटारीचे काम मक्तेदाराला करता आले नाही. अशा आशयाचे वृत्त दैनिक महान कार्य मध्ये प्रसिद्ध झाले होते त्यानुसार शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर मक्तेदारांची बिले तटवली असून  खोक्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार नोटीसा देऊनही सदर खोकीधारकानी आपले स्थान सोडलेले नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत  पुन्हा खोकीधारकांना आठ दिवसाची मुदत वाढ दिले आहे.त्यामुळे  सार्वजनिक बांधकाम विभाग खोकीधारकांपुढे हतबल झाला आहे की काय अशी शंका नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. तर वारंवार या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक वैतागले आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनधारकाचा बळी गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल वाहनधारकातून विचारला जात आहे.