अजित लटके/महान कार्य वृत्तसेवा
कबनूर चौक वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम ग्रामपंचायत प्रशासनाने गुरुवारी राबवली. त्यामुळे कबनूर मुख्य चौकाने मोकळा श्वास घेतला.
कबनूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. येथील दर्ग्या लगत असणारा सुमारे शंभर वर्षापूर्वीचा व पीराचा कट्टा म्हणून प्रसिध्द असलेला दगडी कट्टा जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकला व रस्ता रिकामा केला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली. यावेळी दर्ग्या समोरील चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती.
सकाळी कबनूर डेक्कन रोडवरील गेली अनेक वर्षे असलेली एकमेव मुतारीही जमीनदोस्त केली. तसेच रिक्षा स्टॉप व पोलिस चौकीपुढील अतिक्रमण काढण्यात आले. यावेळीही मोठी वादावादी झाली. यानंतर मारुती मंदीर उत्तर बाजूचे भिंती लगत असणारे अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ग्रामपंचायतीने काही दिवासापूर्वी सुमारे दिडशे अतिक्रमण धारकाना नोटीस दिल्या होत्या. यानंतर बऱ्याच व्यावसायिकानी रस्त्यावरील अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले. गुरुवारी उपसरपंच सुधीर लिगाडे, सरपंच सौ.सुलोचना कट्टी, सदस्य मधुकर मणेरे, सुधीर पाटील, समीर जमादार, प्रविण जाधव, सुनिल काडाप्पा, वैशाली कदम, अर्चना पाटील, सुनीता आडके, रजनी गुरव, मिलींद कोले, जयकुमार काडाप्पा, संजय कट्टी, किशोर पाटील, ग्रामविकास अधिकारी, संजय बर्डे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदीनी या मोहीमेत भाग घेतला. यावेळी पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.