Spread the love

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
बनावट कागदपत्रे सादर करुन प्रशिक्षणार्थी आयएएस या टप्प्यापर्यंत मजल मारलेल्या पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. लोकसेवा आयोगाने बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक झाल्याचे आढळल्यानंतर पूजा खेडकरला निलंबित केले. पूजाला आयएएस तसेच सर्व प्रकारच्या प्रशासकीय सेवांच्या परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक केल्याप्रकरणी पूजा विरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली. या प्रकरणात पूजाला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. पूजा खेडकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी होईल.
पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर अटकेचे संकट टाळण्यासाठी पूजाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देत पूजा खेडकर प्रकरणी पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.