Spread the love

वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं

बीड/महान कार्य वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय तापलं आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसह सूत्रधार म्हणून आरोप असलेल्या वाल्मिक कराडसह 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. त्याआधी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा, यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर त्याच्या आई आणि पत्नीकडून देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. कराडच्या पत्नी पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी पती वाल्मिक कराडवरील सर्व आरोप फेटाळून लावत वाल्मिक कराडला अडकवण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सोबतच, यावेळी माध्यमांशी बोलताना कराडच्या पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती देखील हल्लाबोल केला आहे.


मीही 96 कुळी मराठा आहे….

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पत्नी मंजली वाल्मिक कराड म्हणाल्या मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात ते आधी सिध्द करा, यांना जातीवाद करायला कोणी शिकवला, जातीवादामध्ये आणि राजकारणामध्ये माझ्या नवऱ्याचा बळी दिला जातोय, आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत, असे म्हणत मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर काल वाल्मिक कराडवरती मकोका लावल्यानंतर, समर्थकांनी आणि कुटूंबीयानी ठिय्या आंदोलन केले. त्यात वाल्मिक कराडची 75 वर्षीय आई आणि पत्नीही सहभागी झाली होती. यावेळी माध्यमाशी बोलताना वाल्मिकची पत्नी मंजली वाल्मिक कराडने, जातीवाद आणि राजकारणापायी माझ्या नवऱ्याचा हकनाक बळी दिला जातोय. हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा दिला आहे.


वाल्मिक कराडच्या अटकेचा आज दुसऱ्या दिवशीही परिणाम

परळी शहरातील अनेक दुकानं आजही उघडली नाहीत. शिरसाळा आणि धर्मापुरी या गावांमध्ये आज वाल्मिक कराड याच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे. काल वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळी शहरांमध्ये बाजारपेठ बंद झाली होती. आज परळी बंद असा कोणताही आव्हान करण्यात आले नव्हते, तरीही परळी शहरातील निम्मी बाजारपेठ आताही बंद असल्याचे दिसून येत आहे.


पिंपरी चिंचवडच्या हायफाय सोसायटीत 4 फ्लॅट


पुण्यानंतर वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक बाबुराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजार भावानुसार हा फ्लॅट साडे तीन कोटींच्या किमत आहे. सध्या इथं कोणी राहत नसल्याची माहिती आहे, मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे.