बीड/महान कार्य वृत्तसेवा
भारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज तालुक्यातील कळंमआंबा गावातील प्रियंका हनुमान इंगळेची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यामुळं तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भारताचा होणार पाकिस्तानशी सामना : विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील प्रियंका ही पहिलीच मुलगी आहे, जीची भारतीय खो-खो संघाच्या कर्णधार पदी प्रियंकाची निवड झाली आहे. त्याचबरोबर सध्या 13 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या खो-खो विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय खो-खो संघाचा सामना इराण, मलेशिया कोरिया प्रजासत्ताकच्या खो-खो संघाबरोबर होणार आहे. त्यामुळं या संघाकडून कशा पद्धतीनं प्रतिनिधित्व केलं जातं आणि या स्पर्धेतून आपलं पदक कसं जिंकलं जातं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी प्रियांकाचे वडील हनुमान इंगळे व आई यांच्यावर नातेवाईकांसह मित्रमंडळींना कडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले वडील : प्रियंकाची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर तिचे वडील म्हणाले, ”प्रियंका वयाच्या पंधराव्या वर्षापासून खो-खो खेळत आहे. तिनं आतापर्यंत 23 नॅशनल खो-खो स्पर्धा जिंकल्या आहेत त्याचबरोबर प्रियंकाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देखील मिळाला आहे. तसंच अहिल्या होळकर पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. दिल्ली इथं होणाऱ्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या कर्णधारपदी प्रियंकाची निवड झाली आहे, वडील म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो आणि बीड जिल्ह्यातील खो-खो स्पर्धेतील कर्णधारपदी निवड होणारी पहिलीच मुलगी आहे.”
तिचा खूप अभिमान : तिच्या या निवडीनंतर बोलताना तिची आई म्हणाली, ”प्रियंकाचा मला खूप अभिमान आहे. ती खूप जिद्दी आहे लहानपणापासूनच खो-खो खेळाची तिला आवड होती. त्याचबरोबर तिनं तिचं करिअर सुद्धा यामध्येच घडवायचं निश्चित ठरवलं आणि तिच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं. आज तीची नॅशनल खो-खो स्पर्धेच्या कर्णधारपदी निवड झाल्यामुळं आज आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. बीड जिल्ह्यातील ही पहिलीच मुलगी आज नॅशनल खो-खो स्पर्धेच्या कर्णधार पदी निवड झाल्यामुळं आम्हाला खूप तिचा अभिमान वाटतो.” तसंच बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील या मुलीनं केलेल्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होताना पाहायला मिळत आहे.
भारतीय महिला खो-खो संघाचे सामने :
भारत विरुद्ध कोरिया – 14 जानेवारी 2025
भारत विरुद्ध इराण – 15 जानेवारी 2025
भारत विरुद्ध मलेशिया – 16 जानेवारी 2025