Spread the love

विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले 15 उमेदवार

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात काल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दिल्ली विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज आठवले यांच्या पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
यामध्ये सुलतानपूर, मजरा कोंडली, तिमारपूर, पालम, नवी दिल्ली, पटपरगंज, लक्ष्मी नगर, नरेला, संगम विहार, सदर बाजार, मालवीय नगर, तुघलकाबाद, बदरपूर, चांदनी चौक आणि मतियारा महारल या मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने उमेदवार जाहीर केले आहेत.

आप, भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस
दरम्यान दिल्लीमध्ये सुमारे गेल्या 11 वर्षांपासून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आम आदमी पार्टीने सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर, लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रीक करणारी भाजपा गेल्या 26 वर्षांपासून दिल्ली विधानसभेतून सत्तेबाहेर आहे. त्यामुळे त्यांनीही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे.
दुसरीकडे दिल्लीत अरविंद केजरीवाल सत्तेत येण्यापूर्वी सलग 15 वर्षे दिल्लीत सत्तेत राहिलेली काँग्रेसही विजयासाठी कामला लागली आहे. अशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचीही (आठवले) एन्ट्री झाल्याने दिल्लीची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत कोण बाजी मारणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पाच फेब्रुवारीला मतदान
दिल्लीमध्ये 70 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने 7 जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. यामध्ये 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळी दिल्लीत 1.5 कोटी हून अधिक मतदार मतदान करणार आहेत. तर यापैकी 2.08 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. दरम्यान दिल्लीची ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.