Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कास्टिंग काऊच, अभिनेत्रींचे लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या घटना समोर येतात. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याव्यतिरिक्त इंडस्ट्रीशी संबंधित इतरही काही व्यक्तींनी अभिनेत्रीचे किंवा तरुणींचे लैंगिक शोषण केल्याच्या बातम्या अनेक वेळा आल्या आहेत. आता एका टॉप अभिनेत्रीने एका व्यावसायिकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी व्यावसायिकालाही अटक केली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा उद्योगपतीवर लैंगिक शोषणाचा आरोप
अभिनेत्रीने एका ज्वेलरी बँडचा मालक असलेल्या उद्योपपतीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री हनी रोझ हिने व्यावसायिकाविरोधात तक्रा केली आहे. अभिनेत्री हनी रोझ मल्याळम चित्रपट उद्योगातील टॉप अभिनेत्रींपैंकी एक आहे. हेमा समितीच्या अहवालावरून मल्याळम चित्रपटसृष्टीतून लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.
ज्वेलरी बिझनेसमन अटकेत
मल्याळ अभिनेत्री हनी रोझ हिने केरळचे दिग्गज उद्योगपती बॉबी चमनूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार, बॉबीने तिच्यासोबत अनेक वेळा असभ्य वर्तन केलं. अील संदेश, तसेच आक्षेपार्ह आणि अपमानास्पद कमेंट केल्याचाही दावा तिने केला आहे. हनी रोझने अनेक सोशल मीडिया पोस्टद्वारे उद्योगपती बॉबी चमनूरवर आरोप केले. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की बॉबीने अनेक वेळा आक्षेपार्ह कमेंट केल्या. अश्लील कृत्ये केली.
कोण आहे बॉबी चमनूर?
पोलिसांनी हनी रोझच्या या पोस्टची दखल घेतली आणि बॉबी चमनूरविरुद्ध तक्रार दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी केरळमधील वायनाड येथून बॉबीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. बॉबी चमनूर हे केरळचे एक मोठे उद्योगपती आणि ‘चमनूर इंटरनॅशनल ज्वेलर्स’चे मालक आहेत. याशिवाय बॉबीचे इतरही अनेक व्यवसाय आहेत.
उद्योगपतीने दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, बॉबी चमनूर यांनी हनी रोझचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने म्हटले आहे की, हनी रोझने त्यांच्या कंपनीशी संबंधित दोन कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्याने हनीसोबत डान्स केला, पण मी तिच्यावर कमेंट केली नाही. बॉबी चमनूरने असेही म्हटले की जर तिला काही आक्षेप असता तर तिने ते तेव्हाच सांगितले असते. इतक्या महिन्यांनी ती हे का सांगत आहे, असा सवाल यावेळी त्याने उपस्थित केला.