पुणे/महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. सातत्याने अनेक गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून केली जातंय . सुरेश धस यांच्याकडून रोज या संदर्भात मोठे खुलासे केले जात आहेत. सुरेश धस यांनी राष्ट्रवादीमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे, असा उल्लेख केला त्यानंतर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण या चर्चांना उधाणआले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते चांगलेच संतापले. त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांचा चांगलाचा समाचार घेतला आहे.
राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. याविषयी अजित पवार म्हणाले, सुरेश धसांना जाऊन विचारा. कोणी अशा फालतू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणारा आहे. त्यामुळे त्याला जाऊन विचारा कोण आहे ते त्यांनाच विचाराष्ठ
पक्ष न पाहता दोषींवर कारावाई केली जाणार: अजित पवार
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले, या प्रकरणाची सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होत आहेत. या प्रकरणात जर कोणी दोषी असेल तर त्यांना पाठिशी घालणार नाही. या प्रकरणात आम्ही कोणालाच सोडणार नाही. अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. पक्ष न पाहता दोषींवर कारावाई केली जाणार आहे. आम्ही हत्या प्रकरणात राजकारण आणणार नाही.
काय म्हणाले होते सुरेश धस?
खंडणी आणि देशमुख खून प्रकरणात सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमकपणे बाजू लावून धरत धनंजय मुंडे यांची चहूबाजूंनी कोंडी केली आहे. धनंजय मुंडे राजीनामा देत नसल्याचे पाहून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच क्या हुआ तेरा वादा असे विचारीत लक्ष्य केले.अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण ही बालवाडीतील पोरे आहेत. यांना कशाला माझ्यावर बोलायला सांगता. राष्ट्रवादीतील बडी आणि बदनाम मुन्नीने समोर येऊन बोलावे मग मी बघतो, असे म्हणत मिटकरी आणि चव्हाण यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे, हेच धस यांनी सूचित केले.