Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
कोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा धोका निर्माण झाल्याने जगभरात एकच खळभळ उडाली आहे. भारतात सुरुवातीला बंगळूरु येथे दोन एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे एक आणि काल नागपूरमध्ये दोन जणांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता या व्हारसने मुंबईतही एन्ट्री केली आहे.
मुंबईतील एका सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. तिला हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचारासाठी दाखल केले आहे. येथील डॉक्टरांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्याचे सांगितले. मात्र आरोग्य विभागाच्या कार्यालयाने मात्र अशी काही माहिती नसल्याचे सांगितले.