Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचे स्वागत केलं जातंय . त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आलाय.
मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचे अधिसूचना तात्काळ काढावी यासाठी दिल्लीला गेले होते. तिथून अभिजात मराठी भाषेच्या आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज उदय सामंत यांच्या हाती दिली. आज उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची सदानंद मोरे आणि ज्ञानेश्वर मुळेंसोबत भेट घेतली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची घोषणा झाली असली तरी अधिसूचना न निघाल्याने त्यासंदर्भात ही बैठक होती.
2004 साली जेव्हा नियम तयार केले गेले, तेव्हा त्या भाषेतील ग्रंथांची पुरातनता आणि हजार वर्षांच्या इतिहासाची नोंद असणं गरजेचं होतं. प्राचीन साहित्यग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाते. त्याचबरोबर साहित्यिक परंपरा मूळ असली पाहीजे आणि दुसऱ्या भाषेतून घेतलेली नसावी. या निकषावर तामिळ ही भाषा अभिजात भाषा म्हणून ग्राह्य धरली गेली.
नोव्हेंबर 2005 मध्ये अभिजात भाषेच्या निकषात सुधारणा करण्यात आली आणि संस्कृतला हा दर्जा मिळाला होता. अभिजात भाषा ठरवण्यासाठी त्या भाषेचा इतिहास हा दीड ते दोन हजार वर्षे जुना असणं गरजेचं आहे. प्राचीन साहित्यग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाते. दुसऱ्या भाषेतून सदर भाषा उसनी घेतलेली नसावी. तसेच त्याची एक स्वतंत्र साहित्य परंपरा असावी.प्राचीन भाषा आणि आधुनिक भाषेत फरक असणं गरजेचं आहे.