Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मुंबईत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबईमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिश दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने एका भाजी विक्रेत्याने Torres Company मध्ये तब्बल 4 कोटी रुपये गुंतवले होते. या भाजी विक्रेत्याने एवढा पैसा कुठून आणला? याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर Torres Company ची दादर, नवी मुंबई, कल्याण येथीले दुकान बंद झाली आहे. दुकाने बंद असल्याने नागरिकांनी दुकानासमोर मोठी गर्दी केलीये. याप्रकरणी टोरेस कंपनीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याची गुंतवणूकदारांना आश्वासन टोरेस कंपनीतर्फे देण्यात आले होते. गेल्या महिन्यापर्यंत अनेक नागरिकांचे पैसे परतफेड देखील करण्यात आली. तसेच भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी टोरेस कंपनीने डायमंड हिरा देखील दिला. मात्र हा डायमंड हिरा खोटा असून त्याची बाजारभाव किंमत फक्त 500 रुपये इतकीच असल्याचे समोर आले आहे. या टोरेस कंपनीत लोकांनी 10 लाख तसेच जास्तीत जास्त 50 लाखपर्यंत गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान प्रदीपकुमार वैश्य (वय 31 वर्षे) नावाच्या एका भाजी विक्रेत्याने Torres Company मध्ये 4 कोटी रुपये गुंतवले होते. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच प्रदीपकुमार वैश्य यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे दादरच्या टोरेस शोरूमसमोर भाजीपाल्याचे दुकान आहे. शोरुमसमोर होणारी गर्दी पाहून त्यांनी या कंपनीबाबत माहिती मिळवली. येथे पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत असल्याचे समजल्यावर त्यांनी कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
प्रदीपकुमार वैश्य यांनी 4 कोटी आणले कुठून?
प्रदीपकुमार वैश्य यांनी एवढे 4 कोटी रुपये आणले कुठून ऐवढी गुंतवणूक का केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत प्रदीपकुमार वैश्य यांनी स्वत: खुलासा केला आहे. प्रदीपकुमार वैश्य यांनी सुरूवातीलाच 6 लाख 70 हजार रूपये गुंतवले. त्यानंतर दोन-तीन महिने वेळेत परतावा मिळत होता. यानंतर कंपनीने परतावा देण्याची टक्केवारी वाढवली. यामुळे माझा विश्वास आणखी वाढला. पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवारासह अनेकांना याची माहिती दिली, त्यांच्याकडून पैसे घेतले, घर गहाण ठेवून रक्कम गोळी आणि एकूण 4 कोटी 27 हजार रूपयांची गुंतवणूक केल्याचे वैश्य यांनी पोलिस तक्रारीत म्हंटले आहे.