सदस्य नोंदणी कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीसांची टीका
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाच्या सदस्य अभियानात मी माझा पण हातभार लावला आहे. मी पण 25 सदस्य केले आहेत. भारतीय जानता पार्टी व कम्युनिस्ट पार्टी सोडली तर देशातील सर्व 2300 पक्ष हे खाजगी मालकीचे आहे. भाजप पक्षाची मालकी ही केवळ जनतेची आहे. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असतांना जगातील सर्वात मोठा पक्ष तयार करण्याचे आपण लक्ष ठेवले होत. तेव्हा 18 कोटी सदस्य केलेले होते. आता तो आकडा पार करायचा आहे. महाराष्ट्रत दीड कोटी सदस्य करण्याचे आमचे लक्ष आहे. आपल्याला पक्ष म्हणून व सत्ता म्हणून आपली लोकाभिमुखता टिकवून ठेवायची असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी महाअभियानच्या कार्यक्रमातून कार्यकर्ते आणि पदाधिर्कायांना मार्गदर्शन केलं आहे.
नागपूर शहरात आज सात लाख सदस्य करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. भाजपकडून सदस्य नोंदणीचा महाभियान आज राज्यभर राबवला जात आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होत आहे. नागपुरात हे अभियान महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरात हा सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथ पातळीवर राबवणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सदस्य अभियान महत्त्वाचं मानलं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा यश मिळवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवल जात आहे.