Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
येथील आयजीएम इस्तिळात चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरला कार्यमुक्त केल्यानंतर आरोग्यमंत्र प्रकाश आबीटकर यांना आयजीएमची आठवण आली. आणि घाईगडबडीत सोमवारी आयजीएमच्या कामकाजाची पाहिणी करण्यासाठी धावत्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे या धावत्या दौऱ्यातून काय साध्य होणार असे उपासाहत्मकपणे लोक बोलत आहेत.
सोमवारी शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील एका धार्मिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. प्रोटोकॉल म्हणून मंत्री आबीटकर या कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. त्यानंतर गारगोटीकडे माघारी जाता जाता त्यांनी इचलकरंजीतील आयजीएमला भेट देण्याचे निश्चित केल्याचे कळते.
आमदार आक्रमक, खासदार कुठं आहेत ?
चार दिवसांपूर्वी खासदार धैर्यशील माने यांचे जन्मगाव रुकडी येथील एका चिमुरडीवर कंत्राटी डॉक्टराने शस्त्रक्रिया करण्यास नकार देत खासगी इस्पितळात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. या प्रकारानंतरही खा. माने यांनी वेळात वेळ काढून आयजीएमला भेट देतील, रुग्णांशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. 40 हजारांचं मताधिक्य दिलेल्या इचलकरंजीकरांशी खासदार धैर्यशील माने यांनाही काहीही देणघणं नाही असेच दिसते. मात्र या प्रकारानंतर आ. डॉ. राहूल आवाडे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली होती.
इचलकरंजी कामगार वस्ती आहे. येथे नियमित लहान मोठे अपघात होत असतात, त्यामुळे आर्थोपेडीक विभाग नेहमी सज्ज ठेवणे आवश्यक असताना रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. इतकी गंभीर घटना घडूनही जिल्ह्यातील असलेले आरोग्यमंत्री या प्रकारावर अजिबात गंभीर नससल्याचे दिसून आले. इचलकरजी शहर कोल्हापूर जिल्ह्यातील एक भाग आहे. याचं त्यांनी भान ठेवणे आवश्यक असल्याच्या तिखड प्रतिक्रीया शहरातून उमटत आहेत.