नितीन गडकरी स्पष्टच बोलले
पुणे/महान कार्य वृत्तसेवा
हुशार असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. कार्यक्षम असणे, प्रशासन समजने आणि ज्ञानी असणे यात फरक आहे. खरे तर अनेक समजांनी मिळून आपला देश तयार झाला आहे. आणि त्यातील शेवटचा घटक आहे तो परिवार तर त्यापरिवारातील महत्वाचा घटक आहे तो परिवार. त्यामुळे समाज आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर पहिले परिवारांचा विकास झाला पाहिजे. असेच एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि देश सेवा करण्याबाबत सांगू लागले. मला देशासाठी आयुष्य द्यायचे असल्याचे सांगू लागले. व्यवसायात दिवाळे निघाले असतांना आणि घरी बायको आणि मुले असतांना मी त्यांना देशाला आणि राजकारणालाही गरज नसल्याचे सांगितले. कारण पहिले घर सांभाळले पाहिजे आणि मग देश, असे मी त्यांना सांगितले. कारण राजकारणाबद्दल माझं मत काही चांगल नाही, इथे फक्त ‘यूज अँड थ्रो’केला जातो. असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली असून यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
आदर्शच्या कल्पनेवर राज्य उतरवणारे एकमेव शिवाजी महाराज
पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे. मी आणीबाणीतील प्रॉडक्ट आहे. मी अनेक आंदोलनात होतो. मात्र 50 रुपये जवळ नसल्याने मी जेलमध्ये गेलो. त्यावेळी पैसे पण कोणी द्यायला तयार नव्हते. त्यामुळे एक शिकलो की पैसा आयुष्यातल सध्या नाही पण साधन आहे. खेडकरांनी इमानदारीने नोकरी केली, सामाजिक जाणीव ठेवून मदत केली. सोसायट्यांची काम घेणं आता सर्वपक्षीय धंदा झाला आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यात पण हेच सुरु आहे. आदर्शच्या कल्पनेवर 100 टक्के उतरवणारे राज्य कोणी निर्माण केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असेही नितीन गडकरी म्हणाले.
माझ्या कार्यालयात एकच फोटो अन् तोही केवळ शिवरायांचाच
मुलगा आहे म्हणून निर्णय त्याच्या बाजूने दिला नाही. अनेक लढाया जिंकल्या, पण स्त्रीवर अन्याय, अत्याचार करणारी एकही घटना नाही. शिवाजी महाराज सेक्युलर असतील तर त्यांच्या इतका कोणी सेक्युलर झाला नाही. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही तर सर्व धर्म समभाव आहे. माझ्या कार्यालयात एकच फोटो लावला आहे, आणि तो म्हणजे शिवाजी महाराज यांचा तो फोटो आहे. मराठा समाजाची प्रगती व्हावी यासाठी खेडेकरांनी सुरुवात केली. जिजाऊंच एवढा मोठा प्रकल्प उभा केला. जे आईवडील मुलांवर चांगले संस्कार करतात ती मूल यशस्वी होतात. असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.