सुनिल घुणके/महान कार्य वृत्तसेवा
हुपरी येथील बस्थानकातून दररोज न चुकता हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पाडण्यात या बस्थानकाचा खारीचा का होईना वाटा आहे. बस्थानकाची इमारत सुसज्य आहे मात्र येथील काही सुविधा येथून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पुरेशा नाहीत आणि आहेत त्यांची काही माथेफिरुंनीं वाट लावली आहे. यामध्ये प्रामुख्याने शौचालयांचा समावेश होतो. पुरुषांच्या स्वच्छतागृहाची तर अक्षरशः वाट लागली आहे. पाण्याची सोय आहे मात्र ती दर्शनी ठिकाणी नाही. लाईटची सोय आहे मात्र कॅमेऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे रोड रोमिओ दबा धरून बसल्याची भीती महिला प्रवाशांना वाटते. हिरकणी कक्ष तेवढा सुरक्षित आहे. बस्थानक आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एक कर्मचारी कार्यरत आहे तो मात्र आपली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडतो.
परिवहन विभागाने हुपरी शहर चांदी उद्योगासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यापारी व प्रवाशांची गैरसोय हौऊ नये म्हणून एसटीच्या फेऱ्यांचे वेळेनुसार योग्य नियोजन केले आहे.
कागल ते इचलकरंजी -83, इचलकरंजी ते कागल -83, हुपरी ते रंकाळा -54, रंकाळा ते हुपरी -54, हुपरी ते कुरुंदवाड -22, कुरुंदवाड ते हुपरी -22. सुरू असलेल्या या एसटी फेऱ्या अगदी वेळेत बसस्थानकात येत असतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत नाही. आता गरज आहे ती सरकारी मदतीची नुकताच निवडून आलेले हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोकराव माने यांनी सरकारच्या निधीतून बस्थानकातील सध्या अपॆक्षित असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी खेचून आणावा, अशी अपेक्षा नागरिक आणि प्रवाशी व्यक्त करत आहेत.