Spread the love

सिडनी/महान कार्य वृत्तसेवा
टीम इंडियाचा सिडनी टेस्टचा कॅप्टन जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला आहे. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह याने घातक गोलंदाजी केली अन्‌‍ कांगारूंच्या दांड्या उडवल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट्‌‍स गेल्यानंतर बुमराह अचानक मैदान सोडून बाहेर गेला. बुमराहने विराटच्या हातात कॅप्टन्सी सोपवली आणि ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचवल्या होत्या.
शनिवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला 440 व्होल्टचा धक्का बसला. सामन्यादरम्यान बुमराह बाहेर गेला. मग जागी बदली खेळाडू म्हणून अभिमन्यू इसवरन मैदानावर आला. बुमराहला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. बुमराहला काही वर्षांपूर्वी पाठीला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दीड वर्ष टीम इंडियामधून बाहेर गेला होता. अशातच प्रसिद्ध कृष्णाने यावर मोठी माहिती दिली आहे.
जसप्रीत बुमराहच्या पाठीत दुखापत झाली आहे. वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख करत आहे, अशी माहिती टीम इंडियाचा स्टार बॉलर प्रसिद्ध कृष्णा याने दिली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये नाराजीचं वातावरण आहे. रोहित शर्मा देखील बुमराहच्या दुखापतीमुळे टेन्शनमध्ये आलाय. आता बुमराह बॉलिंगला उतरला नाही तर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष असेल.