शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ शहर हे महाराष्ट्र – कर्नाटक सिमेवर असुन, लगतच सांगली जिल्हा आहे. याबरोबरच श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि खिद्रापुर येथे येण्यासाठी पर्यटकांची नेहमी रिघ लागलेली असते. शिवाय श्री दत्त साखर कारखाना आणि श्री गुरूदत्त शुगर्स या साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतुकही शिरोळ शहरातील मुख्यरस्त्यावरूनच होते. परिनामी वाहतुक कोंडीची मोठी समस्या शहराला सतावत आहे.
यामुळे नृसिंहवाडी आणि जयसिंगपूर आणि सांगली शहराला जोडणार रस्ता शहराबाहेरून कुरूंदवाड येथील धरतीवर काढावा अशी मागणी शहर वासियातुन होत आहे.शहरात असलेल्या ऐकरी वाहतुक मार्गावरून नेहमीच दुहेरी वाहतुक होत असते. शिवाय शिरोळ पोलीस स्टेशनला इतरत्र कामाचा भार असल्यामुळे यामर्गावर कधीच ट्रपिक पोलीस नसतात. कालच एकेरी मार्गावरून स्कुलबस जात असताना ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रक्टर ट्रॉलीला घासली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र दोन्ही बाजुनी यावेळी मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. असे प्रसंग वारंवार होत असतात. यामुळेच आमदार आणि शिरोळ शहराचे मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसुन शहराबाहेरून रस्ता काढून द्यावा अशी मागणी शहर वासियातुन होत आहे.