इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथे गोसावी विकास मंचच्या वतीने राजगुरुनगर येथे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिच्यासह तिच्या बहिणीची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर व परिसरातील गोसावी विकास समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला प्रकरणाबाबत संतप्त नागरिकांनी संशयित आरोपी अजय दास याच्या विरोधात जोरदार घोषनाबाजी करून निदर्शने करण्यात आली. मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी होते.मोर्चाची सुरवात महत्मा गांधी चौकातून करण्यात आले. हातात फलक घेवून घोषणा देत प्रांतकार्यालयावर मोर्चा काढत प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. सदर आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले. मोर्चामध्ये संजय गोसावी, अरुण गोसावी, शिवसेनेचे मलकारी लवटे, आणि मनसेचे रवी गोंदकर, विहिंपचे अमित कुंभार, नितीन माळी, वसंत माळी, विशाल माळी, निळकंठ गोसावी, सागर जाधव, सावकार जाधव, अनिल मुळेकर, आकाश चव्हाण, गणेश जाधव, भरत जाधव आदींसह हजारोंच्या संख्येने गोसावी बांधव, महिला, नागरिक सहभागी झाले होते सदर मोर्चा मध्ये नूतन आमदार राहुल आवाडे हेही सहभागी झाल्याचे दिसून आले हातात काळा झेंडा घेऊन सदर घटनेचा त्यांनी निषेध नोंदवला आंदोलन करते समवेत त्यांनी घोषणाही दिल्या. पंताधिकारी मौसमी चौगुले यांच्याशी चर्चा करून सदर आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाकडे आदोलन कर्त्याची मागणी बाबत प्रयत्न करावेत अशा सूचनाही आमदार राहुल आवाडे यांनी दिल्या.