मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जाहीर दिलगिरी व्यक्त करत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एकप्रकारे वादावर पडदा टाकला. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली, खरी पण आता प्राजक्ता माळी काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारिर्त्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताई सह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सुरेश धस यांनी म्हटलं. दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माङ्गीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
प्राजक्ता माळीने घेतली होती देवेंद्र फडणवीसांची भेट-
सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचा उलेख केला होता. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. यासंदर्भात प्राजक्ता माळीने देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली. या भेटीमध्ये सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ता माळीला आश्वस्त केले.
सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भेट घेणार-
भाजप आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आज सुरेश धस मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप असून या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही सुरेश धस करणार आहेत. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
