Spread the love

सातारा/महान कार्य वृत्तसेवा
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची सातार्‍यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच उदयनराजे यांच्या भेटीला पोहचले. यावेळी उदयनराजेंनी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान केला. मकरंद पाटील यांनी त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देताना शरद पवार हे देशातले राजकारणातील सीनियर असल्यामुळे त्यांनी यापुढे युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचा सल्लाही दिला.
मकरंद पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये ङ्गूट पडल्यानंतर मकरंद पाटलांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मकरंद पाटील हे सातार्‍यातील वाई मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली.
मकरंद पाटलांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी काय म्हटले?
उदयनराजेंनी मकरंद पाटलांच्या भेटीनंतर प्रतिकि‘या देताना म्हटलं की, जलमंदिर हे मकरंद आबांचे घर आहे.मला ते भेटायला आले खूप आनंद झाला. सर्व मतदार म्हणजेच कुटुंब अशा पद्धतीने मकरंद पाटील हे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार उमेदवाराला पाडा, पाडा, पाडा हे वक्तव्य करतील ही मला अपेक्षा नव्हती. शरद पवारांनी मागे जे साम्राज्य उभे केले होतं,त्यांच्या पाठीशी मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मण पाटील होते. त्यामुळे मकरंद पाटलांनी काही काम केल नसतं तर मान्य होतं.
पुढे त्यांनी म्हटलं की, शरद पवार हे राजकारणात महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सीनियर आहेत. त्यांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम करायला हवे.शरद पवार हे पितृतुल्य आहेत, त त्यांनी आता यापुढील पिढीला प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहिजे. हे करणं आता जनतेला अपेक्षित आहे. मकरंद पाटील यांच्या रूपाने न्याय मिळाला मला खूप आनंद झाला.
मकरंद पाटील यांनी काय म्हटले?
मकरंद पाटील यांनी म्हटले की, निवडणुकीच्या दरम्यान उदयनराजेंनी माझ्यासाठी जी भाषणं केलीत त्याचा चांगला लाभ झालाय. आमचे पहिल्यापासूनच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्या कायम सदिच्छा माझ्यासोबत होत्या. आज उदयनराजेंचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे.