वाडा/महान कार्य वृत्तसेवा
राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ-उतारामुळे शेतकर्यांचे हाल होत होते. त्यामुळे सहकारी दूध संघ, खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणार्या दूध उत्पादक शेतकर्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर पाच रुपये तर नंतरच्या कालावधीत सात रुपयांचे अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळत असून शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
खाजगी दूध प्रकल्पांना 3.5 फॅट 8 पॉईंट पाच एसएनएफ गुणमानाच्या दुधासाठी 1 आक्टोंबर 2024 पासून प्रति लिटर 28 रुपये दर निश्चित केला आहे. राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणार्या शेतकर्यांना शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत.
दरम्यान, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, व राजस्थानमध्ये म्हशीच्या दुधाला ही अनुदान दिले जात आहे.