जयसिंगपूर पोलीसात तक्रार
जयसिंगपूर/महान कार्य वृत्तसेवा
ट्रेंडीग कंपनीमध्ये गुंतवणूक करतो असे सांगून 81 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेणीक दत्तात्रय गुरव (मूळ गाव हरोली ता.शिरोळ सध्या रा.ग्रीन व्हॉली अपार्टमेंट स्टेशन रोड जयसिंगपूर) याच्याविरोधात 19 डिसेंबर रोजी जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या फसवणुकीची व्याप्ती वाढत गेली असून आणखी पाच जणांनी जयसिंगपूर पोलिसांत आपली तक्रार दाखल केली आहे. या पाचजणांकडून 30 लाख 90 हजाराची फसवणूक करण्यात आली आहे. यातील संशयीत श्रेणिक गुरव हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, श्रेणीक दत्तात्रय गुरव याचे जयसिंगपूर येथील समर्थ ट्रेडिंग अॅन्ड सर्व्हीसेस या कार्यालयात 4 ऑगस्ट 2023 ते 16 मे 2024 या दरम्यान जयसिंगपूर येथील विजय बाळासाहेब माणगावे यांना चांगल्या परताव्याचे अमिष दाखवुन त्यांना त्याचे एकुण 91 लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. व त्यानंतर 10 लाख रुपये विजय माणगावे यांना परत केली होती. मात्र राहीलेली 81 लाख रुपये रक्कम व त्यावरील परतावा न देता त्यांची फसवणुक केल्याने जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.