पुणे/महान कार्य वृतसेवा
पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिला शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील गंज पेठेतील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदर प्रकरणी महिला शिक्षकेला पोलिसांनी अटक केली असून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यातील गंज पेठेत असणार्या एका शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला. पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहत असून तो इयत्ता दहावीत आहे. बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला.
नेमकं काय घडलं?
आरोपी महिला सुद्धा या शाळेत शिक्षिका असून ती धानोरी येथे वास्तव्यास आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपी महिला शिक्षिकेने त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारातच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. ही शाळा प्रशासनाला कळताच शाळेच्या व्यवस्थापनाने संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसात कळवले तसेच तिला अटकही करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली.