इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजीतील कापड व्यापार्याकडून ग्रे कापड खरेदी करुन त्यापोटी दिलेले बंद असलेल्या खात्यावरील तब्बल 25 चेक देत पैसे देण्यास टाळाटाळ करुन 2 कोटी 37 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी भिलवाडा (राजस्थान) येथील चौघांवर गावभाग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रजत महेश सोनी (वय 28), महेश रतनलाल सोनी (वय 54), रविकांत उर्फ रविराज महेश सोनी (वय 29) व वरुण सुर्यनारायण चौधरी (वय 53 सर्व रा. भिलवाडा) अशी त्यांची नांवे आहेत. यापैकी रजत सोनी याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पंकज जतनसिंह मेहता (रा. दाते मळा) यांनी गावभाग पोलिसात तक्रार दिली आहे.