मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचे अनेक कारनामे पाठीशी घातल्याचं म्हटलं होतं. त्याच प्रवृत्ती वाल्मिक करांडासारख्या व्यक्तींना मोठं करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया देणार असल्याचा एल्गार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी आज बीडमध्ये निघत असलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडायला भाग पाडत नाही तोपर्यंत ठिय्या देत राहू असेही त्यांनी म्हटलं आहे.