Spread the love

उज्ज्वल निकम, सतीश माणशिंदेंची नियुक्ती करावी

बीड/महान कार्य वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आज 19 दिवस पुर्ण झाले आहेत. या घटनेवरून राज्याचं राजकारण देखील तापलं आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधार यांच्यात देखील आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे, तर दुसरीकडे या घटनेने बीडच्या गुन्हेगारीवर बोट ठेवलं आहेस, त्यामुळे राज्यात सध्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून शिक्षा करावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण ङ्गास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे
सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे या सर्व आरोपींना ङ्गाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणामध्ये जेष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधी तज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, त्याचप्रमाणे सदर प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. सदर प्रकरण बीडमध्ये चालवू नये कारण राजकीय हस्तक्षेपामूळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळू देणार नाहीत यासाठीचं हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.