Spread the love

कुरुंदवाड / महान कार्य वृत्तसेवा 

शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नृसिंहवाडीकडून चार चाकी कार गाडी कुरुंदवाडकडे जात असताना पुलाच्या कुरुंदवाड बाजूला आल्यानंतर चार चाकी वाहन विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दोन दूचाकीस्वारानां जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. एक गंभीर जखमी झाला आहे तर एक किरकोळ जखमी आहे. 

घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलाजवळ पुलाच्या कुरुंदवाड बाजूला नृसिंहवाडीहून कुरुंदवाडकडे येणारी चार चाकी कार गाडी भरधाव होती. चार चाकी कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वाराना जोराची धडक दिल्याने एका दुचाकीवर असलेल्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कुरुंदवाड येथील खाजगी दवाखान्यात रवाना करण्यात आले. तर दुसऱ्या दुचाकी स्वाराला किरकोळ लागल्याने मिरज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. सकाळी दहा वाजता या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ होती. अशा वेळेला अपघात झाल्याने या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कुरुंदवाड पोलिसांनी अपघाताची पाहणी केली.