हुपरी/महान कार्य वृत्तसेवा
हुपरी (ता. हातकणंगले) येथे वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले. हुपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघातात चार चाकी गाडी क्रमांक (MH 09-GA-4222) ने मोटार सायकल (MH 09-E-8333) ला धडक दिल्यामुळे कुमार अनंत कुलकर्णी, रा.इंगळी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले. तर जवाहर साखर कारखाना चौपाटी समोर दोन मोटार सायकलीची धडक झाल्याने युवराज जाधव,ओंकार जाधव (रा.रांगोळी) हे जखमी झाले आहेत. तर तीसरा हा श्री अंबाबाई देवालय कमानी समोर झालेल्या अपघात एका महिलेचा मृत्यू झाला.
