Spread the love

शिरोली-नागाव/महान कार्य वृत्तसेवा

मंगळवारी रात्री नऊ च्या सुमारास पुलाची शिरोली येथील हॉटेल दिल्ली दरबार समोर सेवा रस्त्यावर दोन केएमटी बसवर दारूचा नशेत एकाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास पुलाची शिरोली येथील दिल्ली दरबार हॉटेल कोल्हापूरहून शिरोली व पेठवडगाव कडे निघालेल्या दोन केएमटी बसवर दारुच्या नशेत  नागेश अर्जुन वाईडे(रा.जालना) याने दारूच्या नशेत दगडफेक केली आहे. या दगडफेकीत स्नेहल सुनिल कांबळे,(वय-२१)संचिता नितीन कांबळे(वय-१७) , दोघी रा.भुये,ता करवीर व राहुल सुनिलकुमार चोपडे,रा.भादोले (वय२५) हे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर  शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआर येथे नेण्यात आले आहे. काही युवकांनी पाठलाग करून या तरुणास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.