Spread the love

आरोपीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?

बीड/महान कार्य वृत्तसेवा
बीडच्या केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण प्रचंड चर्चेत आहे. या प्रकरणात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बीडमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी या प्रकरणातील सुत्रधार आणि जबाबदार यांना योग्यप्रकारे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंके, राजेश टोपे, संदीप सिरसागर, बजरंग सोनवणे या नेत्यांसह सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सात्वनपर भेट घेतली होती.या भेटीनंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.ही घटना कुणालाही न पटणार आणि न सोसणार आहे.
बीड जे काय घडल,त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना, कुणी येऊन, कुणाला दमदाटी केली, कुणाला मारहाण केली. आणि त्याच्या बद्दलची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करायची भूमिका घेतली. त्यामुळे कुणी बाहेरून येत, व्यक्तिगत हल्ला करतो आणि त्यांची हत्या करून जातो.हे अतिशय गंभीर आहे. आणि या घटनेची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी,असे शरद पवार म्हणाले आहेत.
या प्रकरणात मुख्यमंर्त्यांनी काही आश्वासने दिली आहेत. मुख्यमंर्त्यांनी काही रक्कम दिली आहे, ठिक आहे याने कुटुंबियाला मदत होईल, पण गेलेला माणूस येत नाही, त्या कुटुंबाचे दु:ख आहे, ते काय जाऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले. पण जो पर्यंत या घटनेच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत, सुत्रधार या मागे आहेत. त्यांना तातडीने योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा शब्द शरद पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना दिला आहे.
दरम्यान यावेळेस शरद पवार यांनी देशमुख यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या दोन्ही मुलांचे पुर्ण शिक्षण करणार असल्याचे शरद पवारांनी सांगितल आहे. तसेच देशमुख कुटुंबाला धीर देण्याचे आवाहन पवारांनी यावेळी केले आहे.