Spread the love

खा. धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा

जैन धर्मगुरू आचार्य शांतीसागर महाराज यांच्या नावाने केंद्र सरकारने 5 रूपयाचे टपाल तिकीट प्रसिध्द केले आहे. या संदर्भात हातकणंगलेचे खा. धैर्यशील माने यांनी 2 ऑगस्ट 2020 मध्ये कायदा व सुव्यवस्था मंत्री रवीशंकर प्रसाद यांना निवेदन देवून मागणी केली होती. त्यानंतर खा. माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
प्रथमाचार्य 108 श्री शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी तसेच 2019-20 हे दीक्षा जन्मशताब्दी वर्ष होते. या निमित्ताने त्यांच्या नावाने पोस्टल तिकीट प्रसिध्द करावे, अशी मागणी जैन समाज तसेच दक्षिण भारत जैन सभेने खा. माने यांच्याकडे केली होती. प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी,नांदणी, प.पू.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर, किरण पाटील, बाबासाहेब कापसे, डॉ. सागर पाटील, दक्षिण जैन सभेचे पदाधिकारी, जैन समाजातील श्रावक- श्रावीका यांनी खा. धैर्यशील माने यांच्याकडे मागणी केली होती. या पाठपुराव्याला आज यश आले आहे.