कुरूंदवाड प्रतिनिधी / महेश पवार
कुरूंदवाड येथे शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी नामदार हसन मुश्रीफ यांची राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ जंगी जाहीर सभा झाली. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी गमती गमतीत नागरीकांना सरकारी योजनेची माहिती दिली
बोलताना ते म्हणाले, सुरूवातीला लाडक्या बहिनी मध्ये दोन,तीन अडचनी होत्या.
- आम्हाला मोठा प्रश्न पडला होता. अडीच लाख उत्पनाची मर्यादा काढून टाकली. केसरी आणि पिवळ्या कार्डसाठी
काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते म्हणायचे साहेब एक एक नवऱ्यांना दोन,दोन बायका आहेत त्याच काय करायच ? आम्ही सांगितल नवऱ्यालाच विचारा लाडकी कोण आहे, त्याला देवून टाका … आणि सभेत महिला पोट धरून हासल्या, - एका घरात दोन मुली आहेत 21 वर्षाच्या तर दुसऱ्या मुलीला सुद्धा अनुदान आम्ही देवू अस वचन त्यांनी दिल आहे. परंतु दुसऱ्या बोयकोला काही मिळणार नाही, कारण… प्रतिबंधक कायद्यात असा कायदा आहे आणि तशी जर परवांगी दिली तर, हे दुसरे लग्न करतील. तुमच्यावर अन्याय होईल, म्हणून आम्ही करू देणार नाही.
- महिला सन्मान देणारा निर्णय सरकारने घेतला, प्रॉपर्टीमध्ये 50 % हिस्सा आता महिलेला राहिल,उटसुट आता महिलेला नवऱ्याबरोबर भांडन करता येणार नाही.
- इथुन पुढे नाव लावताना, मुली/मुलांचे नाव आधी नंतर आईच, त्यांनतर वडिलांचे आणि आडनाव मुलांना बाप जन्म देत नाहीतर आई देते. पोटात 9 महिने मुल ती वाढवते आणि तीची नाळ जोडलेली असते. असा महिलांना अधिकार देणारे कायदे आपण केले आहेत.
पुढे योजनांची माहिती सांगताना ते म्हणाले,
- आपल्या मुली जर उच्चशिक्षण घेणार असतील,एम.बी.बी.एस, फार्मसी, इंजिनेरींग,ॲग्रीक्लचर यामध्ये संपुर्ण फि सरकारने माफ केली आहे. आता हि फी सरकार भरणार आहे. तुम्ही भरायची नाही.
- तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. म्हणजे हे पैसे आम्ही तुमच्या खात्यावर वर्ग करणार, तुम्ही पैसे काढून सिलेंडर आणयचा.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केसरी आणि पिवळ्या कार्डावर तांदुळ आणि गहु मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती योजना सुरू आहे.
- शंबर रूपयला चार नग रवा,साखर, तेल आणि डाळ सनावारीला आणि छ.शिवाजी माहराज जंयती आम्ही दरवर्षी देतोय.
- महिला बचत गटामधील काम करणाऱ्या महिलांना 15 लाख देतोय, यापुढे आता 25 लाख लखपती योजना केंद्र सरकारने आणलेली आहे.
- एखादी महिला व्यवसाय करणार असेल स्वता:च्या पायावर उभारणार असेल तर बिनव्याजी अनुदान देणारी अहिल्याबाई होळकर र्स्टाटप योजना सरकारने आणलेली आहे.
- एका मुलीवर ऑपरेशन केल कि दिड लाख रूपये, तीच्या लग्नापर्यंत मिळतील. अशी व्यवस्था सरकारने केलेली आहे.
- एस.टी,बसमध्ये तिकिटात 50% एस.टीत सवलत
एवढ्या मोठ्या निर्णय आणल्या नंतर लाडकेभाऊ म्हणाले, आता आमच काय ?
- 3500 ते 7500 हार्सपावर पर्यंत पुर्णवीज बील माफी शेतीच्या पंपाची केलेली आहे.
आता येणाऱ्या घरच्या विज बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय घेणार आहे. - शेतकऱ्यांना दिवसा 10 तास विज शेती पंपाना देणार
- चार महिन्याला 2 हजार मोदी सरकारचे आणि 2 हजार युती सरकारचे असे, नमो शेतकरी महासन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतोय.
- दुर्दवाने अपघातात शेतकरी जर दगावला तर दोन लाख गोपिनाथ मुंडे योजना आणि आमच्या बँकेतील 2 लाख असे चार लाख रूपये कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतायत
- परवा अवकाळी पाऊस झाला सोयाबीन,भात याच प्रचंड नुकसान झाल आहे. आचार सहिंता उठल्यानंतर त्यालाही भरभरून मदत देणार सरकार मागे पुढे पाहणार नाही.
- आता राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितल कि, आपल्याकडे फार मोठ क्षारपडीचा प्रश्न तयार झालेला आहे. सरकारच्या नियमा प्रमाणे त्यासाठी टेंडर काढलेल आहे.
- 1 लाख सरकारी नोकऱ्यांचे आदेश आम्ही काढलेले आहेत.
- 7 लाख जागा या आरक्षणाच्या निकालामुळे रिक्त आहेत. त्याही जागा भरणार
- 10 वी 12 वी डिप्लोमासाठी 8,10 आणि 12 हजार रूपये स्टायफंड देणारी योजना आम्ही आणलेली आहे. कौशल्य विकास मध्ये भरपुर काम केल आहे.
- कोतवालांचे मानधन वाढव, पोलीस पाटील,अशावर्कर,अगंनवाडी सेविका,मतदनीस यांच मानधन वाढवल बंधुनो फार मोठ निर्णय घेतले आहेत.
तालुक्याच्या विकासासाठी उरलेल्या, राहिलेल्या कामासाठी मी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून वचन देतो. त्यांना संधी द्या, ते तुमचे हामाल म्हणून सेवा करतील. तुमच्या सर्वांच्या जिवनात चांगले दिवस आणतील. या तालुक्याचा चहेरा मोहरा बदलेल. गेल्यावेळी जशी परमेश्वराने त्याला साथ दिली. तशी यावेळीही साथ द्या. अशी मी प्राथर्णा करतो. आमदार राजेंद्र पाटील यड्राकर यांच्या चिन्हासमोरील शिट्टी बटन दाबुन विजयी करावे अस अवाहन त्यांनी केले.