वडार समाजाच्या प्रगतीसाठी गणपतरावदादांना साथ द्या
जयसिंगपूर : प्रतिनिधी :
जयसिंगपूर शहरातील वडार समाजाला पुर्वी हाताने दगड फोडण्याची शासनाकडून परवानगी होती. पण महाविकास आघाडीच्या सत्ता काळात मी महसुल मंत्री असताना हाताने दगडाने फोडण्याची अट शिथिल करून ब्लास्टिंगने दगड उत्खननासाठी परवानगी देवून वडार समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. भविष्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून वडार समाजाचे प्रलंबित विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेवू त्यासाठी सर्वांनीच शिरोळ तालुक्याचे माजी आमदार स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे घेवून जाणार्या गणपतराव पाटील यांच्या पाठीशी वडार समाजाने खंबिरपणे उभे राहून शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी महसुल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
जयसिंगपूर येथील मराठा भवन येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ वडार समाजाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की, शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व दत्त उद्योग समुहाचे प्रमुख स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे काम केले. नेहमीच पुरोगामी विचाराचा जागर करीत समाजवादाची भुमिका घेत शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले. शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या विचारा आणि कार्याचा वारसा घेवून गणपतराव पाटील विविध क्षेत्रात काम करीत आहेत. ते वडर समाजाचा प्रश्न सोडविण्याकरीता निश्चितपणे पुढाकार घेतील याची मला खात्री आहे. यामुळे या निवडणुकीत गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहून त्यांना निवडून द्यावे. काही मंडळी अपक्ष निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका. अपक्षला मत म्हणजेच भाजपला मत आहे. ही आपली भुमी शाहु, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची भुमी आहे. त्यामुळी राज्यातील महायुती सरकारला सत्यातून खाली खेचण्याकरीता आपले मत महायुतीला जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पोवार यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष मुकूंद पोवार प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारनेच वडार समाजाचे प्रश्न सोडवून त्यांना रोजगार दिला. समाजाची प्रगती साधण्यासाठी माजी महसुलमंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आपल्या समाजाच्या प्रश्नांची जाण महाविकास आघाडी सरकारलाच आहे. यामुळे शिरोळ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनाच वडार समाजाने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव घुणकीकर म्हणाले, जयसिंगपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसविण्याच्या जागेला आमदार बाळासाहेब थोरात महसुलमंत्री असताना मंजूरी दिली. त्यामुळे त्यांच्यावर जयसिंगपूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आव्हानास जयसिंगपूर शहरातील नागरिक प्रतिसाद देवून महाविकास आघाडीचे उमेदवार उद्यानपंडीत गणतपराव पाटील यांना विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटीलय यांनी वडार समाजाच्या संवाद मेळाव्यास उपस्थिती दर्शवून शिरोळ तालुक्यातील वडार समाजाने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यास सर्व वडार समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच रोजगार उपलब्धतेसाठी जागेचा प्रश्न निश्चितपणे सोडवू असे आश्वासन देवून या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी जयसिंगपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम, माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर, लक्ष्मीकांत उर्फ बंडा मणियार, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य व शिरोळचे युवा नेते अजिंक्य पाटील, माजी नगरसेवक व वडार समाजाचे नेेते गुंडाप्पा पवार, नितीन बागे, लक्ष्मण धोत्रे, महालक्ष्मी चौकाचे अध्यक्ष बबलु नलवडे, महेश भोसले, सतीश नलवडे, सतीश माने, सागर धोत्रे, दिपक भोसले, अजित पवार, एकनाथ नलवडे, संतोष नलवडे, नंदू कदम, राजू भोसले, जोतीराम उर्फ पिंटू वगरे, बांधकाम कामगार संघटनेचेे अध्यक्ष धनाजी जाधव, संतोष अलकुटे, यशवंत पवार, रंगराव पवार, सुजाता पाटील, रूपाली वाघमारे, योगिता कोले, लता माने यांच्यासह जयसिंगपूर शहरातील वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.