Spread the love

एकसंबा/महान कार्य वृत्तसेवा-
मलिकवाडसह परिसरातील शेकडो वारकरी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात मंगळवारी सकाळी दानपेटीतून अचानक धूर येऊ लागल्याने सर्वांची तारांबळ उडाली. यामुळे दानपेटीतील सुमारे 6 हजारांच्या नोटा जळाल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत मिळालेले अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी विठ्ठल मंदिरातील दानपेटीतून अचानक धूर येऊ लागल्याने उपस्थित नागरिकात तारांबळ उडाली होती. सदर घटनेची माहिती देवस्थान कमिटी आणि नागरिकांना देत दानपेटी उघडण्यात आली. दरम्यान सदर दानपेटीतील काही नोटा जळाल्या असल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये सुमारे सहा हजार दोनशे रुपयांच्या नोटा खराब झाल्या आहेत. तर उर्वरीत दानपेटी सुरक्षित आहे. धूर येण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. यावेळी मंदिर कमिटीतील सदस्य व नागरिक उपस्थित होते.