इचलकरंजी/महानकार्य वृत्तसेवा-
सामान्य कार्यकर्ते, नागरिक यांच्या बळावर विठ्ठल चोपडे यांची उमेदवारी प्रबळ ठरली आहे. त्यामुळे विरोधकांनी आता अपप्रचार चालवला असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. पाणी प्रश्नावर दिशाभूल करण्यासाठीच हा अपप्रचार सुरू आहे, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी जवाहरनगर येथील बैठकीत बोलताना केले.
विठ्ठल चोपडे म्हणाले, इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. राजकारणामुळे ही योजना रखडली आहे. इचलकरंजीकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पंचगंगा नदीतील पाण्याने कावीळ साथ पसरून सुमारे 43जणांचा बळी गेला होता. तरीही या प्रश्नावरून राजकारण करण्याचे दुष्कर्म सुरू आहे.
इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर रोखठोक बोलत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांच्याकडे या प्रश्नावर बोलण्यासारखे काही नाही. त्यांनी योजनेत खोडाच घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे किती वेळा ते नागरिकांना पाणी आणतो म्हणून खोटे आश्वासन देणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे आता विठ्ठल चोपडे हे कोणाची तरी मते खाण्यासाठी उभे आहेत, असा अपप्रचार काही उमेदवारांनी चालवला आहे.
इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याची धमक केवळ एका सामान्य कार्यकर्त्यांमध्येच असू शकते. राजकीय मंडळी केवळ राजकारण करत असून त्यांना पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. तरुणांच्या हाताला काम देता आलेले नाही. इचलकरंजीचा वस्त्रोद्योग डबघाईला का आला याचे त्यांच्याकडे उत्तर नाही.
त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून विठ्ठल चोपडे यांच्या उमेदवारी बाबत अपप्रचार करून नागरिकांची दिशाभूल आता यापुढे करता येणार नाही, असे प्रतिपादनही विठ्ठल चोपडे यांनी केले.
यावेळी माझे आरोग्य सभापती दीपक ढेरे श्रीकांत कांबळे जाफर मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले तानाजी सावंत दगडू कांबळे राहुल लाटणे थोरात नागेश क्यादगी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या