Spread the love

कोल्हापूर : महापुराच्या संकटात आ.सतेज पाटील व आ.ऋतुराज पाटील यांनी आम्हाला मदत केली. वळीवडे गाव दत्तक घेऊन लोकांना आधार दिला. याउलट निवडणुक आल्यावर जागे झालेले महाडिक वळीवडे ग्रामस्थ पुराचे संकट असताना कुठे होते? महापुराच्या संकटात एक रुपयाचीही मदत न करणा-या आणि वळीवडेकरांना वा-यावर सोडणा-या महाडिकांना घरी बसवा असे आवाहन माजी उपसरपंच प्रल्हाद शिरोटे यांनी केले.  आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ वळीवडे येथील कॉर्नर सभेत ते बोलत होते.

शिरोटे पुढे म्हणाले, वळीवडे गावाला महापुराचा फटका बसल्यानंतर डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून गाव दत्तक घेऊन लोकांना आधार दिला. तत्कालीन सरपंचाकडे २५ लाखांचा धनादेश दिला. आ.सतेज पाटील, आ.ऋतुराज पाटील संकटात असलेल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी धावून आले. उलट जनतेसाठी काहीही करायचे नाही आणि जे चांगले काम करतात त्यांच्यावर टीका करायची हीच महाडिकांची पद्धत आहे.  

आ. ऋतुराज पाटील म्हणाले, वळीवडे ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा हि माझ्या कामाची पोचपावती आहे.  येत्या २० तारखेला आपण  मला भरभरून आशीर्वाद द्यावेत. 

राजू वळीवडे, ग्रा. पं. सदस्य कपिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच रूपाली कुसाळे, उपसरपंच भैय्या इंगवले, सुहास तामगावे, मधुकर साळोखे, बाजीराव माने, शरद नवले विपुल दिगंबरे, चंद्रकांत पाटील, गणपती जाधव, किशोर कुसाळे, अरविंद कुसाळे, सचिन चौगुले,प्रकाश शिंदे, भगवान पळसे, महेश शेळके, रघु जगताप, विजय चौगुले, प्रकाश पासनना, राजाराम पवार, अर्जुन गायकवाड, सुधीर डोंगरे, कुलभूषण चौगुले, वैजनाथ गुरव, संजय कावले, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.