Spread the love

दोघांना धडा शिकवा, आंदोलन अंकुशच बळ उल्हास पाटील यांना यशापर्यंत पोहचवेल


शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी माजी खासदार राजु शेट्टी यांनी श्री दत्त साखर कारखान्याचे प्रमुख व कॉग्रेस पक्षाचे शिरोळ विधानसभा मतदार संघातील उमेदवार गणपतराव पाटील, दुसरे कारखानदार राजश्री शाहु विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावर यांच्यावर सडुकन टिका करत या दोघांना पाडा आणि शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना धडा शिकवा अस खुल अवाहन त्यांनी केल.
शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऐतिहासिक तख्त येथे आंदोलन अंकुशन ऊसाला प्रतिटन 3700 रूपये आणि मागचे 200 रूपये व मराठा आंदोलन करार आणि उल्हास पाटील यांना विधानसभेसाठी पाठींबा यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी राजु शेट्टी म्हणाले धनाजी चुडमुंगे यांनी मन मोठ करून माघार घेतली, पाठींबा दिला हाच पाठींबा उल्हास पाटील यांना यशा पर्यंत पोहचवेल गेल्यावर्षीच्या आंदोलनमुळे मागचे प्रतिटन ऊसाला 100 रूपये आणि शिरोळ हातकणंगले तालुक्यातील कारखान्याने गेल्यावर्षी पहिली उचल 2900 रूपये जाहीर केली होती, केवळ आंदोलन आणि आमच्या एकजुटीमुळे आधिकचे 200 रूपये मिळाल शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवाव. चळवळ जिवंत ठेवण्यासाठी विधानसभेत आमच्या सोबत रहाव. गणपतराव पाटील यांचे नवे रंग राहिले नाहीत 10 वर्ष कारखाना चालवतात. आणि त्यांच्यासारखेच यड्रावकरांची संपत्ती आशातील चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत चाललेली आहे. घाम गाळून ही संपती आलेली नाही. किंवा ते रोजगार हामीच्या कामावर गेलेते आणि त्यातुन त्यांना पैसे आले नाहीत असे म्हणत या दोघांना पाडा असा सल्ल्ाा त्यांनी उपस्थितींना दिला.